मोठा मारुती जन्मोत्सवानिमित्त पूजा अभिषेक


फैजपूर : शहरातील पुरातन जागृत देवस्थान म्हणून धोबी वाड्यातील मोठा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात मंगळवारी हनुमान जन्मोत्सव सकाळी सहा वाजता जल, दूध अभिषेक पूजन आरती करून माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भाजपा गटनेते मिलिंद बापू वाघुळदे यांचे हस्ते करण्यात आले. पुरोहित नंदू महाराज, दिनेश जोशी यांनी धार्मिक विधीवत पूजन केले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. कोरोना नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने गर्दी न करता, मास्क चा वापर करून साजरा करण्यात आला. कोरोना महामारी नष्ट व्हावी. जनजीवन सुरळीत सुरु रहावा, सर्वाजण सुखी समाधानी रहावे अशी प्रार्थना माजी नगराध्यक्ष यांनी प्रार्थना केली. यावेळी रमेश गलवाडे, विलास काठोके, रणजित राजपूत, कैलास चौधरी, संजू धोबी,धोंडू सोनवणे, विवेक चौधरी, शिवा रावते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !