लाभार्थींना दिलासा : दोन कोटी 70 लाखांचे अनुदान प्राप्त


रावेर : लॉकडाऊन काळात गरीब लाभार्थींसाठी तहसीलमधुन चांगली बातमी समोर आली आहे. तालुक्यातील 13 हजार 500 विविध लाभार्थींसाठी दोन कोटी 70 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार जी.एन.शेलकर हे सर्व अनुदान लाभार्थी खात्यावर वर्ग करण्यासाठी मंगळवारपासून झटत आहेत तर गुरुवारपर्यंत सर्व याद्या व अनुदान संबंधीत बँकेत वर्ग केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध योजनांच्या लाभार्थींना दिलासा
कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन 0.2 लावले आहे. या दरम्यान गरीब लाभार्थींना शासनाने अनुदान देणार असल्याचे सांगितले होते. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थींना एप्रिल व मे महिन्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तर श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींना मागील आठशे व आताचे दोन हजार असे एकूण दोन हजार 800 रुपये मिळणार आहे. यामध्ये गरीब लाभार्थींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी लिपिक योगेश मोहिते, ऑपरेटर पुरषोत्तम महाजन आदींचे सहकार्य लाभल्याचे शेलकर यांनी सांगितले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !