‘कोरोना’ मुळे मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन

बोदवड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे नेहमी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणार्‍या पत्रकारांचा परीवार मात्र उघड्यावर आले आहेत त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या परीवारास आर्थिक मदत देण्यात यावी तसेच पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावा, अशी मागणी बोदवड तालुक्यातील पत्रकार संस्थातर्फे करण्यात आली. या संदर्भात तहसीलदारांन निवेदन देण्यात आले.

कर्तव्याशी इमान ठेवणार्‍या पत्रकाराच्या कुटुंबांना द्यावी मदत
सर्वत्र विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहा:कार उडाला असून अनेक जण आजारी आहेत तर अनेकांना मृत्यू झालेला आहे. ‘पत्रकार’ हे समाजाच्या हिताचे काम करीत असतांना त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी कोठेना-कोठे त्यांना ‘कोरोना’ शी सामना करावा लागत आहे मात्र तरीही न डगमगता ते आपल्या कर्तव्याशी इमान राखून जनसेवेचे हे कार्य दिवसरात्र करीत आहेत. अलिकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील बर्‍याच पत्रकारांचा ‘कोरोना’ मुळे दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यात बोदवडचे पत्रकार प्रकाश वसंत चौधरी यांचा समावेश आहे. पत्रकारांच्या झालेल्या मृत्यु व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर पाहता त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. घरातील कमावती व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना अचानकपणे निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे अशा मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना व वारसांना 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.




यांनी दिले निवेदन
निवेदन देताना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बैरागी, जिया शेख, अमोल अमोदकर, नाना पाटील, निवृत्ती ढोले, सुहास बारी, रवींद्र मराठे आदी पत्रकार उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार प्रथमेश घोलप, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !