मुंबई-गोरखपूर आणि पुणे- गोरखपूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन
भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे आरक्षित असणार्या उन्हाळी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष (8 फेर्या)
01259 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 28, 29 व 5 व 6 मे रोजी सुटल्यानंतर गोरखपूर येथे दुसर्या दिवशी 2.5 वाजता गोरखपूरला पोहोचेल. 1260 विशेष गोरखपूर येथून 29 व 30 एप्रिल व 6 व 7 रोजी 4.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.



पुणे-गोरखपूर विशेष एकमार्गी (वन वे)
01473 पुणे-गोरखूर विशेष गाडी 28 रोजी 8.20 वाजता सुटेल व गोरखपूर तिसर्या दिवशी 9.40 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

