दुचाकीवरून जाणार्‍यास हटकले : महिलेसह एकाला मारहाण


यावल : तालुक्यातील कासारखेडा येथे वेगात दुचाकी वरून जाणार्‍यांस हटकल्याचा राग येवून महिलेसह एकास सात जणांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाळु शांताराम पाटील (रा.कासारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय ऊर्फ बंटी काशिनाथ साळुंखे (रा.चिंचोली) हा आपल्या सोबत त्याच्या गावातील सहा जण घेवुन तो दुपारी कासारखेडा गावात आला व वेगात जात असतांना त्यास फिर्यादीने सांगीतले की, आमच्याकडे दुखद घटना घडली आहे. तुम्ही दुसर्‍या रस्त्याने जा याचे वाईट वाटून दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 ए. डी. 4604, एम.एच.19 बी.एफ.4761, एम. एच. 19 डी.पी. 9665 व एक विना नंबरच्या वाहनावरत्र असलेल्या अनोळखी सहा अशा सात जणांनी फिर्यादी व घरात जावूून फिर्यादीला मारहाण केला. वरील संशयीतांविरोधात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !