कोरोनाबाधीतांना सुविधांसाठी बीडीओंसह कर्मचारी देणार वेतन


रावेर : कोरोना बाधीतांना उपचारासाठी तसेच सोयी-सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्यासह आपल्यासह इतर कर्मचार्‍यांचा एक दिवसांचा वेतन ग्रामीण रुग्णालयाला वस्तु स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. केोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे पेशंटची संख्या रोज वाढत आहे. बेड व सोयी-सुविधा अपुरी पडत असल्याने येथील रावेर पंचयात समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल आपले एक दिवसाचे वेतन देणार आहे. सोबत पंचायत समिती स्टॉप, शिक्षक, ग्रामसेवक, जिल्हा परीषद बांधकाम, जिल्हा परीषद सिंचन विभाग, महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी आपला एक दिवसाचे वेतन देणार आहेत. दरम्यान, रावेर पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीदेखील प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच जिल्हा परीषद सदस्य व पंचायत समिती सदस्यदेखील रोख स्वरुपात मदत करणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !