एचआयव्हीच्या लागणनंतरही तिने केले तब्बल चार विवाह
पतीला संशय आल्याने रक्त तपासणीत बाब उघड ; लग्नासाठी मध्यस्थी करणार्या दलाल महिलेले जळगावात चोपले
जळगाव : पत्नीला एड्स असल्याची शंका पतीला आल्यानंतर पत्नी मात्र तसे काहीच झाले नसल्याचा आव आणत असल्याने रक्त चाचणीचा निर्णय झाला मात्र पत्नीने त्यास नकार दिल्यानंतर अखेर पतीचा 20 लाखांचा विमा असल्याने त्यासाठी चाचणी गरजेची असल्याचे सांगितल्यानंतर पत्नीचे मनपरीवर्तन झाले व चाचणीही झाली मात्र त्यात पत्नीला एडस् असल्याची बाब निष्पन्न होवून पतीच्या पायाखालची वाळू सरकली. या प्रकारानंतर लग्न जमवण्यासाठी दिड लाखांची दलाली घेणार्या दोंडाईचातील महिलेला जळगावात बोलावून पैशांची मागणी केली मात्र पैशांवरून वाद झाल्याने नवविवाहित युवकाने या दलाल महिलेला चांगलाच चोप दिल्याची तर त्यानंतर मुलाच्या हाताला या महिलेने चावा घेतल्याची घटना मंगळवारी शहरात उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
दलालीची रक्कम मागण्यावरून बोभाटा
दोंडाईचातील दलाल महिलेने सुरत येथील तरुणाचा बुलढाण्यातील एडस् झालेल्या तरुणीशी विवाह लावला. या विवाहासाठी तरुणाकडून तब्बल दीड लाख उकळण्यात आले. हे पैसे परत करावेत म्हणून त्या महिलेसह दोन जण व तरुणासह त्याच्याकडील काही मंडळी जळगावात आले. शहरातील एका दवाखान्याबाहेर त्याचा वाद झाल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे अशाच प्रकारे एडस् झालेल्या तरुणीचा यापूर्वी तीन जणांसोबत विवाह झाल्याची बोंबही यावेळी फुटल्याने दलाल महिलेला तरुणाने चांगलाच चोप दिला.
असा झाला प्रकरणाचा बोभाटा
पत्नी लपून औषधांचे सेवन करीत आहे मात्र पती असूनही आपल्याला सांगत नाही म्हणून तरुणाला शंका आली. त्याने सुरतमध्येच नातेवाईकाला हा प्रकार सांगितला. गोळ्यांची माहिती काढायला सुरुवात केल्यानंतर रक्त तपासणीचा निर्णय घेतला. या तपासणीला तरुणीने नकार दिला. पतीचा 20 लाखाचा विमा आहे, त्याला वारस म्हणून पत्नी लागते व त्यासाठी रक्ताचे अहवाल जोडावे लागतात असे सांगून तरुणीचे रक्त तपासले. त्याचा अहवाल हातात पडताच तरुणाचे हातपाय गळाले. त्यात एडस्ची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणीच्या बॅगेतील कागदपत्रे तपासले असता सुरत येथील एआरटी केंद्राचा अहवाल मिळून आला.
तरुणालाही गंभीर आजाराची शक्यता
मुलगी बुलडाणा येथील मुलगा सुरतचा व मध्यस्थी महिला दोंडाईचा येथील. त्याशिवाय तरुणाचे काही नातेवाईक कुसुंबा येथील असल्याने मंगळवारी सर्व जण ठरल्याप्रमाणे महामार्गावरील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बाहेर जमले. तेथे दलाल महिलेला पाहताच तरुणाचा संताप झाला आणि त्याने तिला चोप द्यायला सुुरुवात केली. पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रकरण जळगावच्या बाहेरचे असल्याने सुरत येते तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या तरुणीने याआधी देखील तीन जणांशी अशाच पध्दतीचा विवाह केल्याचे तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले. त्याचे काही फोटोही त्यांच्याजवळ होते. दरम्यान, तरुणाने त्या तरुणीची शारिरीक संबंध ठेवल्याने त्यालाही आजाराची गंभीर शक्यता असून वैद्यकीय तपासणीत प्रकार समोर येणार आहे.