अन् त्याने रेमडेसिवर इंजेक्शनमध्ये भरले चक्क सलाईनचे पाणी !


पोलिसांच्या चौकशीत बाब उघड : रेमडेसिवरचा काळाबाजार प्रकरणात उघड झाली बाब : जप्त जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द

भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात ब्लॅकमध्ये विक्री दोन आरोपींच्या बाजारपेठ पोलिसांनी बुधवार, 21 रोजी मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातील चार इंजेक्शन जप्त केले होते. पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या खोलवर चौकशीत एका नामांकीत रुग्णालयात काम करणार्‍या स्वच्छता कर्मचार्‍याने चक्क रेमडेसीवर इंजेक्शमध्ये सलाईनचे पाणी भरून त्याचा संशयीत आरोपींना पुरवठा केला. पोलिस चौकशीत त्याने कबुलीही दिली मात्र संशयीत अल्पवयीन असल्याने त्यास अटक करण्यात आली नाही. सुमारे दोन इंजेक्शनमध्ये त्याने असा प्रकार केल्याची बाब समोर आली.

न्यायालयाच्या आदेशानंतर इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांकडे सुपर्द
जप्त इंजेक्शनचा गरजू रुग्णांसाठी वापर होण्यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ न्यायालयाला पत्र दिले होते. न्यायालयाने जप्त केलेले चारही इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांना देण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर मंगळवारी हे जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात एक अल्पवयीनाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तो अल्पवयीन असल्याने अद्याप त्यास अटक करण्यात आल्यची बाब समोर आली आहे.




तीन आरोपींना झाली होती अटक
पोलिस उपअधीक्षकांना भुसावळातील बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये रेमडेसीवरची ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अचानक तपाणी केल्यानंतर बाथरूममधून चार रेमडेसीवर इंजेक्शन जप्त केले होते. या प्रकरणी ओम पॅथालॉजीचे चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक करण्यात आल्यानंतर राहुल चुडामण रजाणे (32, गोलाणी, साईनगर, गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ) यास शुक्रवारी अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना कोठडी सुनावण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !