फैजपूर मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन भाजपच्या वाटेवर


फैजपूर- मधुकर सहकारी साखर करखान्याचे चेअरमन माजी गृहराज्यमंत्री जे.टी.महाजन यांचे चिरंजीव शरद महाजन भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाने लावलेले रोपटे वटवृक्ष झाले असले तरी त्या वटवृक्षाच्या फांद्या आता गळायला सुरुवात झाली असल्याचे चित्र समोर आहे. यातच अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून भाजपची ताकद वाढली आहे. आता नामदार हरीभाऊ जावळेदेखील शरद महाजन यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे.

तर काँग्रेसची डोकेदुखी वाढणार !
या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुःखी वाढणार असल्याची चर्चा आहे. मसाका चेअरमन शरद महाजन यांच्याशी संपर्क साधला असता महाजन यांनी सांगितले की, भाजपात प्रवेशाबाबत र्चा सुरू आहे मात्र आपण सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय घेणार आहोता शिवाय आपल्या भागातील जे वैभव आहे ते मधुकर सहकारी साखर कारखाना हा टिकला पाहिजे हाच माझा हेतू आहे. कार्यकर्ते सांगती, तो मी निर्णय घेईल. लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय जाहीर करू, असेही महाजन म्हणाले.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा प्रवेश येत्या 22 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपा-सेना युतीच्या घोषणेसाठी पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबईत येत असून यावेळी राज्यातील महत्वपूर्ण व्यक्तींचा भाजपात प्रवेश सोहळा होत असून या सोहळ्यात मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाजनांच्या प्रवेशामुळे काँग्रेसचे वर्चस्व कमी होवून भाजपाची ताकद वाढेल, असे जाणकारांना वाटते.


कॉपी करू नका.