कोरोना रोखण्यासाठी रावेर तालुक्यातील नागरीकांची होणार तपासणी


रावेर : रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत 254 टीम तयार करण्यात आल्या असून या टीम शुक्रवापासून ‘प्रत्येकाच्या घरा पर्यंत जाऊन कुटुंबातील सर्वांची तपासणी करणार आहे. यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी ग्रामीण भागातील जनतेला केले आहे.

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी तालुक्यात 254 टीम
ग्रामीण भागात कोरोना बाधीत रुग्ण शोधण्यासाठी 254 टीम तयार केल्या असून यामध्ये एक सुपरव्हायजर तर तीन कर्मचारी प्रत्येक टीममध्ये असतील ही शोध मोहिम 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत राबविली जाणार आहे.




हलगर्जीपणा केल्यास कारवाई
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियाना अंतर्गत सर्वेक्षणात गावातील एकही घर सुटणार नाही याची काळजी घेण्याचे सर्व टीम यांना सूचित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण सकाळी आठ ते दुपारी अकरा या वेळेत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे रीपोर्टींग याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रला करणे बंधनकारक आहे. कर्तव्यात टाळाटाळ करणार्‍या व कामकाजात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी काढले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !