भुसावळात महिलांनी लोकवर्गणीतून साकारला रस्ता


पालिका बेदखल : सुरभीनगरासह साधना नगर भागातील रहिवाशांना दिलासा

भुसावळ : शहरातील सुरभीनगरासह साधनानगर भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यान त्रस्त महिलावर्गाने एकत्र येत प्रत्येकी 200 रुपये जमा करून दोन ट्रक मुरूमासह खडी मागवली व स्वतःच कच्चा रस्ता श्रमदान करून तयार केला. रस्ता कामांसाठी आता नागरीकांनाच पुढाकार घ्यावा लागत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

प्रभाग 22 मधील महिलांचा पुढाकार
प्रभाग क्रमांक 22 मधील सुरभी नगरासह साधनानगराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिका प्रशासनाकडे रस्ता कामाची मागणी करण्यात आली होती मात्र दखल घेतली जात नसल्याने अखेर महिलांना एकत्र येत लोकवर्गणी करून मुरूमासह खडी टाकून रस्त्याची वाताहत थांबवली. सुरभीनगर पुल ते गणपती मंदीरापर्यंतचा रस्ता महिलांनी श्रमदानातून तयार केला आहे. या कामासाठी प्रभागातील महिला जाईबाई जाधव, अर्चना धांडे, अर्चना पाटील, चौधरी, कल्पना जाधव, वैशाली महाजन, मयुरी वानखेडे, मंदाकीनी चौधरी, निधी जोशी, पाटील, सुरेखा पवार, मुक्ताबाई मिस्तरी, नलिनी कांबळे, जयश्री पाटील या महिलांनी पुढाकार घेत श्रमदान केले.


कॉपी करू नका.