चोपडा पाटबंधारे उपविभागाचा कालवा निरीक्षक एसीबीच्या जळ्यात
400 रुपयांची लाच भोवली : लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी मागितली लाच
चोपडा : पाटबंधारे उपविभाग चोपडा कार्यालयातून लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी 400 रुपयांची लाच मागणार्या कालवा निरीक्षकाला लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चोपडा कार्यालयाच्या आवारातच रंगेहाथ अटक केली. या कारवाईने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली. विजय गिरधर पाटील (57, हतनुर कॉलनी, चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
400 रुपयांची लाच भोवली
चोपडा तालुक्यातील 70 वर्षीय तक्रारदार व त्यांच्या भाऊबंदकीच्या नावे असलेली वडीलोपार्जीत शेतीची खातेफोड करण्यासाठी त्यांना लाभक्षेत्र दाखला हवा असल्याने त्यांनी चोपडा कार्यालयात शुक्रवारी संपर्क साधल्यानंतर आरोपी कालवा निरीक्षक विजय पाटील यांनी 400 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाचेची पडताळणी झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, प्रशांत ठाकुर, कॉन्स्टेबल पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने आरोपीला कार्यालयाच्या आवारातच लाच घेताना रंगेहाथ पकडले.