यावलचा पाणीप्रश्न मिटला : नगरपालिकेला मिळाले आवर्तन

आमदाराच्या पुढाकाराने आवर्तन मिळाल्याची भाजपा गटनेता नंदा महाजन यांची माहिती


Yaval’s water issue resolved: Municipality receives water allocation. यावल (25 जून 2026) : यावल नगरपालिकेच्या साठवण तलावावर भाजपाच्या गटनेता नंदा महाजन व सहकारी नगरसेवकांनी भेट देवुन पाहणी केली होती. दरम्यान पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी दोन दिवस शहराला पाणीपुरेल इतका जलसाठा असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने आमदार अमोल जावळे व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला. आमदार जावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी बोलून तत्काळ आवर्तन उपलब्ध करून दिले आहे. व आता हतनूर कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले असून शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

यावलचा पाणीप्रश्न मिटला
यावल नगरपरिषदेच्या भाजपाच्या गटनेत नंदाताई राजेंद्र महाजन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेत वर्षा आकाश चोपडे, नगरसेविका सविता विजय नन्नवरे, नगरसेविका शुभांगी रोशन येवले सह आदींनी नगरपरिषद च्या साठवण तलावावर जाऊन पाहणी केली होती. तेथे पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे यांनी तलावात दोन दिवस पाणीपुरेल इतका जलसाठा असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा विरोधी गटाच्या नगरसेविकांनी आमदार अमोल जावळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला आणि यावल शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तेव्हा आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून आवर्तन सोडण्याचे सांगितले तेव्हा जिल्हाधिकार्‍यांनी यावल नगरपालिकेकरीता आवर्तन सोडले आहे. आता लवकरच यावल शहरात हतनूर कालव्याच्या माध्यमातून साठवण तलावात आवर्तन दाखल होईल आणि यामुळे शहराचा आता पाण्याचा प्रश्न सुटला आहे.-पुर्ण-फोटो आहे




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !