बल्करची राख पिंप्रीसेकम रस्त्यावर : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार


भुसावळ : बल्करमधील शिल्लक राख शुक्रवारी पिंप्रीसेकम रस्त्यावर टाकण्यात आल्याने पिंप्रीसेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयाकडे तक्रार केली. दीपनगर केंद्राने संबंधीत कंत्राटदारास निर्देश देवून राखेची विल्हेवाट लावली असलीतरी सातत्याने घडत असलेल्या या प्रकारामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

रीफिलींगचे प्रकार कायम
शुक्रवारी मुंबई येथील एका एजंटचे बल्करमध्ये एक टँक्टरच्या ट्रॉली भरेल इतकी राख शिल्लक होती. नवीन राख भरण्यापूर्वी संबंधीत बल्कर चालकाने बल्कर पिंप्रीसेकम रस्त्यावर नेवून राख रस्त्यावर टाकल्याने वाहतूकीस अडथळ्यासह प्रदूषण वाढत असल्याचे पाहून पिंप्रीसेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनी जळगाव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. दुपारी लागलीच मजूर लावून ही राख उचलण्यात आली. दीपनगरातून वीजनिर्मिती झाल्यानंतर टाकाऊ फ्लॉय अ‍ॅश बल्करव्दारे औद्योगिक वापरासाठी नेली जाते तर अद्यापही रीफिलींगचे प्रकार सुरूच असल्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.


कॉपी करू नका.