इनरव्हील क्लब भुसावळतर्फे बेविनारचे आयोजन
भुसावळ : इनरव्हील क्लब भुसावळतर्फे कोवीड 19 लसीकरण जागृकता या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून डॉ.सुजाता केळकर यांनी कोविड 19 या लसीकरणाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून जागरूकता निर्माण केली. कोविडबाबत अनेक गैरसमज असल्याचे त्यांनी सांगितले. बेविनारचे आयोजन इनरव्हील क्लब भुसावळ, इनरव्हील क्लब भुसावळ ब्लॉसम, इनरव्हील क्लब खरगोन, इनरव्हील क्लब जालना सेंट्रलच्या सगळ्या सदस्यांकरिता आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षा शीतल भराडिया यांनी सांगितले की, अशा प्रकारे जनजागृती करून इनरव्हील क्लबतर्फे आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य पार पाडू. प्रकल्पाच्या प्रमुख अतिथी प्रांतपाल मीनलजी लाठी, रश्मीजी शर्मा, स्मिताजी बियाणी होत्या.




