नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अनाथ मुलींना घेणार दत्तक
भुसावळ : कोरोना महामारीमुळे कुटुबांतील पाल्य (विशेषतः मुलगी) अनाथ झाली असल्यास त्यांना पु.ओ.नाहाटा महाविद्यालयातील दोन ते तीन विद्यार्थी दत्तक घेणार आहेत. या संदर्भात कुणाला काही माहिती असल्यास संबंधितानी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील (9822787933) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.




