खेडीत बांधकाम ठेकेदाराचा खून

जळगाव : तालुक्यातील खेडी पेट्रोल पंपाजवळ बांधकाम ठेकेदाराचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. बिपीन दिनकर मोरे (35) असे मृत ठेकेदाराचे नाव आहे. समजलेल्या माहितीनुसार, मोरे दुचाकीवरून येत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघा आरोपींनी त्यांच्यावर चाकूहल्ला चढवला व यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अमोल मराठे, शंकर मराठे व अरुण मराठे यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी व मयतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते शिवाय या संदर्भात पोलिसातही तक्रारी करण्यात आल्या होत्या व त्यातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे.
