नशीब बलवत्तर म्हणून बचावले सहा जण
नंदुरबार तालुक्यात शिवण नदीला आलेल्या पुराने सहा वाहिले मात्र सतर्कतेने वाचले प्राण
नंदुरबार : तालुक्यातील राजापूर येथे शिवण नदीत फरशीवरून सहा जण वाहिल्याची घटना रविवारी घडली. रविवारी दुपारी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी शेतातून परत येणारे शेतमजूर धर्मा हेमा पवार, सविता धर्मा पवार, वंदना गोटू पवार, पाबीबाई बद्री राठोड, क्रिष्णा प्रभू जाधव, लालसिंग फुलू गावीत हे नदीच्या फरशीवरून नदी पार करीत असतांना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने काही कळण्याआधीच चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहिले. नदी गावाजवळच असल्याने एकच आरडाओरडा सुरू झाल्यानंतर काही अंतरावर संबंधीत वाहून गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी लगेच नदीत उडी टाकून वाहणार्या सहा जणांना नदीबाहेर काढले. दरम्यान, यावर्षी सततचा पावसाचा जोर कायम असून राजापूरवासीयांना नंदुरबारला जाण्यासाठी मोठे अंतर कापून जावे लागत आहे. नदीला कोणत्या वेळेस पूर येईल किंवा धरणातून केव्हा पाणी सोडले जाईल? याची शश्वती कुणालाही नाही.