लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


भुसावळ : रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत सुधीर पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा भला मोठा बुके देवून सत्कार केला व जनसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खडसे यांनी अनिकेत पाटील यांच्या विविधांधी सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी देवा वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हे आवर्जून वाचा : खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट

रुग्णालयाला दिलेल्या संगणक भेटीचे कौतुक
वाढदिवसानिमित्त बॅनर, जाहिरात व इतर अनावश्यक खर्च टाळत समाजभान ठेवून ग्रामीण रुग्णालयाला रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत सुधीर पाटील यांनी गुरुवारी अत्याधुनिक प्रणालीचे संगणक भेट दिल्याने या उपक्रमाचे खासदारांनी विशेष अभिनंदन करून अनिकेत पाटील यांचे कौतुक केले. यापुढेदेखील निरंतर अशीच समाजसेवा घडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !