रुढी परंपरेला फाटा : मनुरला मुलीने दिला वडीलांना अग्नीडाग


बोदवड- तालुक्यातील मनुर बु.॥ येथे आपल्या वडिलांना मुलींने अग्नीडाग दिल्याची घटना 21 रोजी घडली. गायत्री परीवाराचे कार्यकर्ते अनिरुद्ध पाटील याचे सासरे पंजाबराव मुंढे याचे अल्पशा आजाराने निधन झाले. पंजाबराव मुंढे यांना मनिषा मुंढे, पल्लवी मुंढे, मिनल मुंढे व सोनल मुंढे या चार मुली होत्या व मुली याच आपली मुले असल्याचे ते नेहमी मानत. बुलढाणा जिल्ह्यातील ढोरपगावचे रहिवासी असलेल्या पंजाबराव मुंढे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने मुलींनीच वडिलांना अग्निडाग देण्याचा निश्‍चय केला. गायत्री परीवाराच्या विधी नुसार मोठी मुलगी मनीषा पाटीलने अग्नी संस्कार केला.


कॉपी करू नका.