विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच : नामदार हरीभाऊ जावळे


रावेर : कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे या वेळेला देखील प्रचंड मतांनी आपण निवडून येवू, हा आपल्याला विश्‍वास असून आपणच पक्षाचा खरा आधारस्तंभ आहात आणि आपल्या माध्यमातूनच हा विजय सुकर होणार असल्याचा आशावाद नामदार हरीभाऊ जावळे यांनी येथे व्यक्त केला. शहरातील अग्रवाल भवनात बूथप्रमुख, पेज प्रमुख, गण प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक पडली. याप्रसंगी नामदार हरीभाऊ जावळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जनतेपर्यंत कामे पोहोचवणे ही जवाबदारी
जि.प.चे माजी सदस्य सुरेश धनके म्हणाले की, हरीभाऊ जावळे यांच्या माध्यमातून रावेर मतदारसंघात प्रचंड विकासाची कामे झाली आहेत. तालुक्यात अस एकही गाव नाही जिथे विकासकाम झाल नाही फक्त आता झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणे आता आपली जबाबदारी आहे. तेव्हा आपला बुथ प्रत्येकाने मजबूत केला पाहिजे.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य हिरालाल चौधरी, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस वासु नरवाडे, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, जुम्मा तडवी, संदीप सावळे, प्रल्हाद पाटील, भाजप शहराध्यक्ष मनोज श्रावक, रवी पाटील, प्रफुल्ल जवरे आणि रावेर तालुक्यातील सर्व बूथ प्रमुख, पेज प्रमुख, गण प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुख उपस्थित होते.


कॉपी करू नका.