अप शालिमार एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ कर्मचार्‍याला धक्काबुक्की


प्रवाशाला अटक : बर्थवर व्यवस्थित झोपण्याचे सांगितल्याने मारहाण केल्याचा आरोप

भुसावळ : अप शालिमार एक्स्प्रेसमध्ये गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाला प्रवाशाने मारहाण केल्याची घटना 21 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जळगाव-पाचोर्‍यादरम्यान घडली. आरोपीला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. झाले असे की, आरपीएफ आरक्षक मनोजकुमार नथुलाल यांच्यासह कसबे, विनय जाधव आदी कर्मचारी अप शालिमार एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते ईगतपुरीदरम्यान रात्र गस्तीवर होते. हे कर्मचारी कोच क्रमांक एस- 13 मध्ये गेल्यानंतर बर्थ क्रमांक 11 वरून प्रवास करणार्‍या महेश तुकाराम पाटील (निगुड, ता.धुळे) हे व्यवस्थित झोपले नसल्याने त्यांना कर्मचारी मनोजकुमार यांनी त्यांना व्यवस्थित झोपा, असे सांगितल्याने त्याचा त्यांना राग आला व त्यांनी कर्मचार्‍यास धक्काबुक्की केली, बेल्ट ओढला तसेच शिवीगाळदेखील केली. पाचोरा स्थानकावर प्रवाशाला आरपीएफ कर्मचार्‍याच्या ताब्यात देण्यात आले व रात्रीची गस्त पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आरोपी प्रवाशास ताब्यात घेवून भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.