दहिवदमध्ये अवैध बायो डिझेल पंपावर पोलिसांची कारवाई
तीन हजार लिटर बायो डिजेलसह 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
शिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर काररखान्यासमोर विनापरवाना सुरू असलेल्या अवैध डिझेल पंपावर मंगळवारी दुपारी तालुका व पुरवठा यांनी संयुक्त कारवाई करीत 25 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील दहिवदजवळ शिरपूर सहकारी साखर कारखान्यालगत हॉटेल आईसाहेबच्या शेजारी विना परवानगी पेट्रोल पंप सुरु असल्याची गोपनीय माहिती सांगवी येथील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती.ि मळालेली माहितीची खातरजमा करून महसूल विभागाच्या सहकार्याने तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी घटनास्थळी छापा टाकला असता उघड्यावर अत्यंत धोकादायक स्थितीत विना परवाना महिंद्रा पिकअप (एम.एच.02-4557) क्रमांकाच्या वाहनातून ट्रक (एम.एच.18 ए.ए.5086 व एम.पी.09-0417) अशा दोन ट्रकमध्ये डिझेल भरतांना पथकास आढळून आले. अधिक तपासणी केली असता अनेक जमिनीत एक हजार लिटर क्षमतेची डिझेल टाकी आढळून आली.पोलीस आणि महसूल पथकाच्या संयुक्त कारवाईत दोन लाख 26 हजार 800 रुपये किंमतीचे तीन हजार 150 लिटर बायोडिझेल व 20 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रक, तीन लाख रुपये किंमतीचा पीकअप आणि 20 हजार रुपये किंमतीचा इतर साहित्य असे 25 लाख 46 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडितख अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी आनिल माने व तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरणार, हवालदार लक्ष्मण गवळी, हेमंत पाटील, संजीव जाधव, आनार पवार,शाम वळवी, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, राजीव गीते, हेमंत फुलपगारे, खसावद, संजय देवरे व पुरवठा अधिकारी मायानंद भामरे व आदी कर्मचार्यांनी केली.


