येवतीत मुसळधार पावसाने घर भुईसपाट
बोदवड- तालुक्यातील येवती येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने हरी नथ्थू बोरसे यांचे घर भुईसपाट झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, रात्री नऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यानंतर घराचे छत कोसळले. बोरसे यांच्या कुटुंबातील तिघे व्यक्ती दबले गेल्यानंतर नागरीकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. तिघांना किरकोळ जखमा झाल्या तर घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेत गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.