18 हजारांची लाच भोवली : दोंडाईचातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात


दोंडाईचा : तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संदर्भात न्यायालयात दोषारोपपत्र ब वर्गात (बी समरी) पाठवण्यासाठी 18 हजारांची लाच मागणार्‍या दोंडाईचा पोलिस ठाण्यातील हवालदाराला नाशिक एसीबीच्या पथकाने लाच घेताच अटक करण्यात आली. मंगळवार, 25 रोजी हा सापळा यशस्वी झाला. विजय शंकरराव मोरे (वय 50) असे अटकेतील लाचखोर हवालदाराचे नाव आहे.

पोलिस ठाण्यामागेच स्वीकारली लाच
दोंडाईचा येथील 19 वर्षीय तक्रारदारासह त्याच्या नातेवाईकांविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे व या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात ब वर्गात पाठवण्यात पाठवण्यासाठी आरोपी हवालदार विजय मोरे यांनी 25 रोजी 20 हजारांची लाच मागितली मात्र 18 हजारांमध्ये तडजोड झाली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला. पोलिस ठाण्यामागील रीकाम्या पोलिस क्वार्टरमध्ये लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली व त्याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे,
पोलिस उपअधीक्षक (वाचक) पोलीस उपअधीक्षक विजय जाधव (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, हवालदार सचिन गोसावी, हवालदार दीपक कुशारे, नाईक एकनाथ बाविस्कर, नाईक प्रकाश डोंगरे, चालक जाधव आदींनी यशस्वी केला.

लाच मागितल्यास साधावा संपर्क
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नाशिकच्या टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !