15 लाखांचा हायवा ट्रक लांबवणारे भामटे जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडीयेथून 23 सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता चोरट्यांनी राहुल गुसिंगे यांच्या घराबाहेरून टाटा कंपनीचा 15 लाख रुपये किंमतीचा हायवा ट्रक औरंगाबाद ग्रामीणमधील चिखलठाणा हद्दीतून लांबवला होता. चोरी झालेला हायवा हा मध्यप्रदेश राज्यात जाणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या तसेच त्यांच्या ताब्यातून महागडा हायवा ट्रकही जप्त करण्यात आला. अनिल रामसिंग जोनवाल (26, रा.खडी पिंपळगाव, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) व संजय धनसिंग जंघाले (35, डोंगरगाव, ता.फुलंबी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मध्यप्रदेश सीमेवर आवळल्या मुसक्या
मुक्ताईनगर तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या अंतुर्लीजवळून आरोपी मध्यप्रदेशात चोरलेले वाहन घेवून जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी आरोपींना वाहनासह ताब्यात घेणयत आले. आरोपींना चिखलठाणा (औरंगाबाद ग्रामीण) पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात हवालदार रवींद्र पाटील, अशोक महाजन, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, विनोद पाटील, अनिल देशमुख, अश्रफ शेख, दीपक पाटील, दीपक शिंदे , दादाभाऊ पाटील, मुरलीधर बारी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.