अत्याचार प्रकरणातील पसार आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : रामानंदनगर पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीस फुस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पसार आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. रामा सुरेश कसबे (19, रा.राजीव गांधी नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नावे आहे. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून पसार होता.
जळगावात आवळल्या मुसक्या
आरोपी रामा कसबे हा निलगरी सर्कल, रेल्वे फाटकजवळ, उधना, सुरत येथे राहता. आरोपी जळगावात येणार असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाल्यानंतर एएसआय अशोक महाजन, हवालदार अनिल इंगळे, सुनील दामोदरे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, इद्रीस पठाण यांनी केली. दरम्यान, मंगळवारी आरोपी जळगाव रेल्वे स्थानकावर येताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळत रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.