महामार्गावर मारहाण करीत तरुणाला लूटले : पाच आरोपींना अटक
धुळे : धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील तरुणाची मुंबई-आग्रा महामार्गावर लूट करण्यात आली होती. या लुटीत तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल व पैशांचे पाकीट व रोख रकमेची लूट करण्यात आली होती. सोनगीर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे. लूट करणार्या तरुणांची ओळख पटल्याने त्यांच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत पाच तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

