उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर भाजपाचा होणार विजय


भाजपचे राष्ट्रीय सचिव भूपेंद्र यादव यांचा धुळ्यातील मेळाव्यात विश्‍वास

धुळे : लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील आठही जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा आपण जिंकाल, अशी खात्री आहे. भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक बूथवर निवडणूक लढेल आणि जिंकेल, असा विश्‍वास भाजपचे राष्ट्रीय सचिव भूपेंद्र यादव यांनी धुळ्यातील मेळाव्यात मंगळवारी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी होते. प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे आमदार, खासदार, शहर- जिल्हा व ग्रामीण जिल्हाध्यक्ष, अन्य पदाधिकारी, बूथ व शक्ती केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते.

42 जागा जिंकणार -गिरीश महाजन
यंदा विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील 47 पैकी किमान 42 जागा आम्ही जिंकू, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. पक्षात कुठलीही गटबाजी करू नका, सर्वांनी कामाला लागावे. पक्षाच्याच जुन्या जाणत्यांना उमेदवारी मिळेल. भाजप- शिवसेनेत युती होईल आणि राज्यात 220 हून अधिक जागा जिंकू, असे सांगून त्यांनी विरोधकांवर टिकेची तोफ डागत विरोधक लागलीच ईव्हीएम घोटाळ्याचे तुणतुणे वाजवत असल्याची टिका केली. दरम्यान, दिल्लीतील बैठकीमुळे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित नसल्याचे समजते. यावेळी अनेकांनी भाजपात प्रवेश केला.


कॉपी करू नका.