रेल्वे प्रशासनाने केला सतर्क तिकीट निरीक्षकांच्या कार्याचा गौरव
हरवलेली चिमुकलीले सोपवले होते माता-पित्यांच्या ताब्यात
भुसावळ : बर्हाणपूरातून चुकून दुसर्या गाडीत बसलेल्या दोन वर्षीय चिमुकलीची आई-वडीलांशी भेट घालून सतर्कता दाखवणार्या दोघा तिकीट निरीक्षकांचा मंगळवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरव कला. ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये दोन वर्षीय चिमुकली ाही दिवसांपूर्वी आढळली होती मात्र तिच्या आई-वडीलांचा पत्ता लागत नव्हता. अनिल सोनी व अजय खोसला या तिकीट निरीक्षकांनी या संदर्भात बर्हाणपूर रेल्वे स्थानकावर सूचित केले तर त्यावेळी चिमुकली हरवल्याची घोषणा करण्यासाठी आई-वडिलदेखील पोहोचले. काही वेळात चिमुकली आई-वडीलांपर्यंत पोहोचल्याने व समयसूचकता व सतर्कता दाखवल्याने ोघा तिकीट निरीक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहा.वाणिज्य प्रबंधक अजय कुमार उपस्थित होते.