p>

ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करा, यश आपलेच


बी.व्ही.गायकवाड : कंडारी जिल्हा परीषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भुसावळ- विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून ध्येयाच्या वाटेवर मार्गक्रमण केल्यास निश्‍चित यश मिळेल, असा आशावाद व्यक्त करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा तत्त्वज्ञान आत्मसात करून स्वतःची प्रगती साधा, असा सल्ला रेल्वेतील सेवानिवृत्त अधिकारी बी.व्ही.गायकवाड यांनी येथे दिला. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, कंडारी येथे उपदेश फाउंडेशन यांच्यावतीने शाळेतील मराठी व उर्दूच्या 147 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गायकवाड बोलत होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.जतीन मेढे, डॉ.सूर्यभान पाटील, सुमंगल अहिरे, गौतम साळुंखे, ग्रामसेवक प्रशांत तायडे, प्रा.संजीव पांडव, अरुण वाघमारे, उपदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, गौतम सपकाळे, सुवर्णा तायडे, अंकिता तायडे, टी.एन.खोब्रागडे, अरुण वाघमारे, माजी मुख्याध्यापक जनार्दन जाधव यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील, नरेश बाविस्कर, शैलेजा तळले, विद्या चंदेले, अनिता धनराळे, प्रदीप साखरे, शबाना परवीन, शेख अशपाक यांच्यासह सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

गुरूंचा आदर करा -प्रा.मेढे
प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी गोष्टीरूपाने प्राणीमात्रावर दया करणे, गुरुंचा अदर करणे, शिक्षण हेच विद्यार्थ्यांची शिदोरी आहे हे पटवून दिले. केंद्रीय विद्यालयाचे उपप्राचार्य टी.एन.खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयातील कॉम्प्युटर लॅब, प्रयोगशाळा आदी सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांसाठी ते सदैव खुले करुन देण्याची जबाबदारी माझी असेल, असेही ते म्हणाले. प्रा.डॉ.जतीन मेढे यांना पी.एच.डी.मिळाल्याबद्दल त्यांना डू.बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बहिष्कृत भारत’ पुस्तक देऊन उपदेश फाऊंडेशनच्या वतीने गौरविण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, धम्मचारी गौतम सपकाळे, सचिव संजीव पांडव यांच्यासह उपदेश फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व जि.प.प्राथमिक मराठी व उर्दू शाळा कंडारी या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक प्रदीप साखरे यांनी तर सूत्रसंचालन जनार्दन जाधव यांनी केले. आभार नरेश बाविस्कर यांनी मानले.


कॉपी करू नका.