भुसावळात कल्याण मटका खेळताना एकाला अटक


भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागातील गोल्डन लॉजच्या बाजूला संशयीत आरोपी शेख सद्दाम शेख तस्लीम (26, रा.नसरवांजी फाईल, भुसावळ) हा कल्याण मटका खेळवताना आढळल्याने बाजारपेठ पोलिसांनी त्यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 810 रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर पाटील, संजय भदाणे, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


कॉपी करू नका.