भुसावळात प्रश्न विचारण्याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थिनीस बदडले
भुसावळ : प्रश्न विचारण्याचा राग आल्याने शिक्षकानेच विद्यार्थिनीला बदडल्याची घटना सेंट्रल रेल्वे इंग्लिश मीडियम शाळेत बुधवारी सकाळी घडली. 16 वर्षीय विद्यार्थिनीने संशयीत आरोपी शिक्षक सुकांत मिश्रा यांना प्रश्न विचारला मात्र शिक्षकाने त्याचे उत्तर देण्याऐवजी विद्यार्थिनीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत यापुढेही अशाच पद्धत्तीने त्रास देईल, अशी धमकी दिली. विद्यार्थिनीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी असलेल्या शिक्षकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी विद्यार्थिनीस उपचार व प्रमाणपत्रासाठी वरणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टर नसल्याने उपचार होवू शकले नसल्याने या विद्यार्थिनीला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.