खंडवा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक तपासणी मोहिम
340 प्रवाशांकडून पावणेदोन लाखांचा दंड वसुल
भुसावळ : रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत बुधवारी खंडवा रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेने अचानक मोहिम राबवत 340 प्रवाशांकडून तब्बल एक लाख 73 हजार 230 रुपयांचा दंड वसुल केला. या कारवाईने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 36 तिकीट निरीक्षकांसह सात रेल्वे सुरक्षा कर्मचार्यांचची मदत घेत कारवाई करण्यात आली. विना तिकीट प्रवास करणार्या 107 प्रवाशांकडून 54 हजार 450 रुपये दंड तसेच स्लीपर डब्यातून जनरल तिकीटावर प्रवास करणार्या 229 प्रवाशांकडून एक लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला शिवाय सामानाची बुकींगविना वाहतूक करणार्या चार प्रवाशांकडून तीन हजार 280 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत हेमंत सावकारे, निसार खान, एन.पी.अहिरवार, पी.वि.ठाकुर, पी.एम.पाटील, एस.एन.चौधरी, वाय.डी.पाठक, पी.एच.पाटील, एम.के.श्रीवास्तव, ए.एम.खान, एम.के.राज, एस.पी.मालपुरे, वि.बी.गौतम, रंजना संसारे, अल्वीन गायकवाड आदी सहभागी झाले. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी नियमानुसार योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.