भुसावळात श्री भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
भुसावळ : श्री.भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील जामनेर रोडवरील बिरसा मुंडा चौकात श्री भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकास नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी ठाकूर समाजाचे ज्येष्ठ नागरीक हिरामण ठाकूर, सत्यविजय ठाकूर, नामदेव ठाकूर यांच्याहस्ते स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी स्मारकाचे भव्य स्वरूपात सुशोभीकरण लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन राजकुमार ठाकूर यांनी तर आभार उमेश ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय ठाकूर, दत्तात्रय ठाकूर, दीपक काठे, ईश्वर जोहरी, प्रवीण ठाकूर, संजय ठाकूर, अभिलाष ठाकूर, मोहन ठाकूर, अक्षय ठाकूर, राहुल वरणकार, किरण मिस्त्री, प्रदीप सपकाळे, अरुण कांबळे, गोलू राखुंडे , संजय विठ्ठल ठाकूर आदींनी परीश्रम घेतले.




