भाजीपाला विक्री करणार्‍या व्यावसायीकाकडून तरुणीवर अत्याचार


नागपूर : भाजीपाला विक्री करणार्‍या व्यावसायीकाने 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अमोल शामराव ठाकरे (31) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडीतेच्या तक्रारीनुसार, आरोपीने पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर 1 डिसेंबर 2020 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत अत्याचार केला. पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी तरुणीच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !