पॅरोलवर सुटलेल्या माजी सरपंचाची हत्या
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निर्घृण हत्या करण्यात आली. शेळके हा शुक्रवारी दुपारी त्यांच्या शेतात काम करीत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यावर वार केले. उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
पॅरोलवर बाहेर येताच केली हत्या
13 नोव्हेंबर 2010 रोजी नारायणगव्हाण सेवा संस्था अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांची नगर-पुणे महामार्गावर गोळ्या झाडून हत्या झाली होती. ती हत्या तत्कालीन सरपंच राजाराम शेळके याने सुपारी देऊन केली होती. या हत्ये प्रकरणी राजाराम शेळके यास शिक्षा झाली होती. सध्या तो पॅरोल रजेवर होता.



