भुसावळात आरपीएफ उपनिरीक्षकाला धक्काबुक्की : आरोपी जाळ्यात


भुसावळ : भुसावळातील आरपीएफ उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पसार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. नरेश बाबुराव गुळवे (42, रा.पंधरा बंगला, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या यार्डातील एका उपनिरीक्षकासह त्यांचे सहकारी 23 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता सहकार्‍यांसह कन्हैय्याकुंज हॉटेलजवळ आल्यानंतर संशयीत आरोपी नरेश गुळवे याने रेल्वे सुरक्षा बलाने यापूर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात ठेवून वाहुळकर यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला होता. उपनिरीक्षकांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरनं.485/2019, भादंवि 353, 504, 506, 323 प्रमाणे 23 रोजी पहाटे 12.46 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
गुन्हा घडल्यापासून आरोपी पसार होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आरोपी पंधरा बंगला भागात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल अडकमोल, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव व चालक हवालदार अयाज सय्यद आदींनी केली. तपास सहाय्यक निरीक्षक कितीर्र्कर करीत आहेत.


कॉपी करू नका.