अत्याचारातून तरुणी गर्भवती : तरुणाला अटक
पेण : 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याने पीडीता पाच महिन्यांची गर्भवती राहिली. या प्रकरणी आरोपी श्रेयस सुरेश बाटे (19, बाटेवाडा, नंदीमाळ नाका) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. 1 डिसेंबर 2020 ते 8 जून 2021 या कालावधीत आरोपीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण ,पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे या अधिक तपास करत आहेत.



