उपराजधानीत अल्पवयीन बालकाची अपहरणानंतर हत्या
नागपूर : 15 वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची क्रुरपणे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे (15) असे खून झालेल्या बालकाचे नाव असून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सूरज रामभूज शाहू (25) यास अटक केली.
काकाने केलेल्या पाणउतार्याचा पुतण्याच्या खूनातून बदला
आरोपी सुरज शाहू योने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, तो फॅब्रिकेटिंगची कामे करतो सव रायसोनी कॉलेजच्या मागे राहतो. आझादरनगर परिसरात राहणार्या एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम असता मयत राज पांडेच्या काकांनी आरोपी शाहूचा पाणउतारा केला होता. मुलीच्या मागे लागल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली व त्यानंतर मुलीचे लग्न झाले. त्यामुळे आरोपी शाहू राजच्या काकांवर चिडून होता. त्यांच्यावर सूड उगविण्याची तो संधी शोधत होता. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता त्याने राजचे अपहरण केले व हुडकेश्वरमधील वंजारी कॉलेजजवळच्या एका निर्जन ठिकाणी राजच्या डोक्यात दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला च राज खाली पडताच नंतर त्याला आरोपी शाहूने निर्घृणपणे दगडाने ठेचले. त्यानंतर ब्लेडने त्याच्या हाताच्या नस कापून त्याची हत्या केली. यानंतर राजच्या कुटुंबीयांना फोन करून राज सुखरूप पाहिजे असेल तर त्याच्या काकाचे शीर (मुंडके) कापून व्हॉट्सपवर फोटो पाठवा, असे आरोपी मागणी करीत राहिला. रात्री पांडे कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटना कळवताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन एमआयडीसीत दाखल झाल्यानंतर त्यांनी यंत्रणेला कामाला लावले. मध्यरात्री आरोपी शाहू बोरखेडीजवळ (बुटीबोरी) पोलिसांच्या हाती लागला.



