बोदवडमध्ये रोडरोमिओंचा उच्छाद : कारवाईसाठी पोलिस प्रशासनाकडे साकडे


वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेने दिले पोलिसांना निवेदन

बोदवड- शहरातील महाविद्यालयाच्या परीसरात एका युवतीचा विनयभंग झाल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील महाविद्यालयाच्या आवारात रोडरोमिओंना उच्छाद मांडल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेने बोदवड पोलिसांकडे निवेदन देवून टारगटांवर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील महाविद्यालयाच्या परीसरात युवतींची छेडखानी केली जात असून मुली दहशतीखाली आहेत. बदनामीपोटी तरुणी पाल्यांना हे प्रकार सांगत नसल्याने टारगटांची हिंमत वाढल्याने संबंधिताचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. अध्यक्ष शैलेश वराडे, स्वप्नील पाटील, प्रवीण शिंदे व दीपक खराटे यांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, बोदवड महाविद्यालयाचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल म्हणाले की, महाविद्यालयाला दोन होमगार्ड मिळाले असून यापुढे असे प्रकार घडायला नको व झालेला प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असल्याचे ते म्हणाले.


कॉपी करू नका.