संतापजनक : अल्पवयीन बहिणीवर भावानेच केला अत्याचार
पिंपरी : बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना चिंचवडमध्ये उघड झाली. 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर भावानेच अत्याचार केला व त्यातून बहिण गर्भवती राहिल्याची घटना उघड झाली आहे. बिजलीनगर, चिंचवड येथे 15 एप्रिल ते मे 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. पीडितेच्या आईने याप्रकरणी बुधवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून 21 वर्षीय आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
इंजिनियरिंगचे शिक्षण घेणार्या आरोपीने बारावीत शिकणार्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला व घटना कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नीता उबाळे तपास करीत आहेत.



