पिकनिकला निघालेल्या महिलेसह मुलाची हत्या : पती बेपत्ता


पुणे : पिकनिकला निघालेल्या कुटुंबातील महिलेसह तिच्या आठ वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे तर मृत महिलेचे पती मात्र अद्याप बेपत्ता आहे. पुण्याजवळील सासवड गावात मंगळवारी आलिया शेख यांचा तीक्ष्ण हत्यारांनी वार केलेला मृतदेह आढळला तर तिचा आठ वर्षीय मुलगा अयान शेख याचाही मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळला. मयत महिला आलिया यांचे पती आबीद शेख अद्याप बेपत्ता असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळली आहे. आबीद शेख अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाची उकल होणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !