अज्ञात वाहनाने उडवले : तिघांचा मृत्यू


नांदेड : नांदेड : ते नायगाव महामार्गावरील धनेगाव चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्यानंतर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातात विनोद दर्शने (19), लंकेश गवाले (21, दोघे रा.मारतळा, ता.लोहा) व कंधार तालुक्यातील गऊळ येथील सतीश देवकांबळे (20) यांचा मृत्यू झाला. तिघे जण चंदासिंघ कॉर्नरकडून जुन्या पुलाकडे जात असलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !