आई व मुलाच्या खुनानंतर पतीचा मृतदेह धरणाजवळ आढळला


पुणे : सासवड येथील आयान शेख (6) आणि आलिया शेख (35) या आईसह मुलाचा खून झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पती आबीद शेख याचा मृतदेह खडकवासला धरणाजवळ शुक्रवारी खानापूर गावाजवळ पाण्यात आढळल्याने खळबळ उडाली. खिशातील कागदपत्रांमुळे आबीद शेख यांची ओळख पटली. शेख कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून 2007 पासून नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. काही दिवसांपूर्वी ते धानोरीतून चहरोलीमध्ये राहायला गेले होते. आबिद शेख एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मात्र, ऑटिझम हा आजार असलेल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. या कुटुंबातील माय-लेकरांची नेमकी कुणी हत्या केली व आबीद यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !