मूर्ती धरणाच्या भिंतीला भगदाड : जामनेर तालुुक्यात घबराट


जामनेर : कांग प्रकल्पावर कांग नदीवर असलेल्या मूर्ती धरणाच्या भिंतीला पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे भगदाड पडल्याने जामनेर तालुक्यात घबराट पसरली आहे. मूर्ती धरणाच्या सांडव्याची काँक्रिटची भिंत वाहिल्याने धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला आहे. या घटनेनंतर जामनेर तहसीलदारांनी कांग नदीच्या काठावर असणार्‍या गोद्री, फत्तेपूर, टाकळी, निमखेडी, मेहेगांव, जळांद्री, सावरला, आमखेडा, ओझर सामरोद, टाकरखेडा, जामनेर, हिवरखेडा यांच्यासह अनेक गांवामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या पाण्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीचा भरावही वाहून जात आहे. धरण फूटल्यास सोयगाव तालुक्यासह जामनेर तालुक्यातील काही गावांना याचा धोका होण्याची शक्यता असल्याने घबराटीचे वातावरण आहे.

पाण्याचा प्रवाह बदलविण्यासाठी प्रयत्न
मशनरीच्या मदतीने पाण्याचा प्रवाह बदलविण्याचा प्रयत्न सुरू आहे व भिंतीचा वाहून गेलेला भराव भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. धरणाच्या खाली असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.