पुतण्यानेच केली काकाची हत्या : दाम्पत्यास अटक


नागपूर : मुलाच्या हत्येची धमकी दिल्याने भेदरलेल्या दाम्पत्याने 55 वर्षीय इसमाची हत्या केली. रविवारी रात्री पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसेनगरात ही घटना घडली. या घटनेत नामदेव लक्ष्मण निनावे (55) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी नितीन निनावे व त्याची पत्नी माधुरी निनावे विरोधात गुन्हा दाखल केला. मयत नामदेव यांनी नितीनच्या पाच वर्षाच्या मुलाचा गळा कापण्याची धमकी दिल्याने नितीनने पत्नीच्या मदतीने हातोड्याने वार करून नामदेवला गंभीर जखमी केले व नामदेवला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित केले होते. पाचपावली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्याला अटक केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !