अडचणीत वाढ : अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीने परकीय चलन नियमन कायद (फेमा) 1999 अंतर्गत पुणे आणि नागपूरमधील 40.34 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती.
गुन्हे रद्दसाठी न्यायालयात याचिका
ईडीने 10 फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.



