फैजपूरात एस.टी.चालकाने विद्यार्थ्यांच्या अंगावर नेली बस


चिनावल बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी थांबवली होती बस

फैजपूर- चिनावल बस वेळेवर येत नसल्याने गुरूवारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बर्‍हाणपूर-धुळे बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.3100) थांबवण्याचा प्रयत्न केला असता उद्दाम चालकाने थेट विद्यार्थिनींच्या अंगावर बस नेण्याचा संतापजनक प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात आला. फैजपूर बसस्थानकात गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बस थांबवण्यात आली.

अन् विद्यार्थिनी बचावल्या
फैजपूर-चिनावल-कुंभारखेडा-रावेर ही एस.टी.बस नवीन वेळा पत्रकानुसार बंद करण्यात आल्याने विद्यार्थी बसस्थानकात तीन ते चार तास थांबून असतात तर गुरुवारी विद्यार्थ्याां होणारा त्रास सहन न झाल्याने त्यांनी एक निवेदन तयार करून स्वाक्षर्‍या घेतल्या. त्यातच तीन तास होवूनही चिनावल बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बर्‍हाणपूर-धुळे बस (एम.एच.20 बी.एल.3100) थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र एस.टी.वरील चालकाने चक्क विद्यार्थिनींच्या अंगावर नेली तर विद्यार्थिनींनी सतर्कता दाखवल्याने मोठी जीवीतहानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना फैजपूर बस स्थानकात घडली असती. विद्यार्थिनींशी यावेळी संबंधित चालकाने विद्यार्थिनीशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, दररोज येणारी फैजपूर-चिनावल कुंभारखेडा-रावेर या मार्गे जाणारी बस गुरुवारी दुपारी वेळेवर आली नाही शिवाय 12.30 तसेच 1.45 व चार वाजेच्या बसदेखील वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांचे घरी जाण्यासाठी हाल होत आहेत. विद्यार्थ्यांनी एस.टी.डेपो प्रशासनाकडे निवेदन देवून दखल घेण्याची मागणी केली आहे.

 


कॉपी करू नका.