भुसावळात पुन्हा शिक्षकाने केली विद्यार्थ्यास मारहाण


भुसावळ- प्रश्‍न विचारण्याचा राग आल्याने विद्यार्थिनीस शिक्षकाने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शहरातील महाराणा प्रताप हायस्कूलमधील शिक्षक घोडके यांनी नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यास शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थी उभा न राहिल्याने मारहाण केली. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आईने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वीही सेंट्रल रेल्वे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक मिश्रा यांनी एका विद्यार्थीनीला मारहाण केली होती.


कॉपी करू नका.